नमस्कार मित्रांनो आपण या शालेय सुविचार मराठी छोटे 50 विषयावरच चर्चा करणार आहोत या विषयावर आम्ही एक मजेदार व मस्त सुविचार लिहिलेले आहेत आपल्यास ही आवडीलाशी आम्ही आशा करतो तर शालेय सुविचार म्हणजे काय शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी व मुलींसाठी आहे कारण शाळेत जाण्यासाठी आपल्याला प्रेरणा लागते आपल्यास काहीतरी आपले ध्येय लागते त्यासाठीच आपण शाळेत असतो काहीही करू शकत नाही आपल्या आयुष्यामध्ये आपण कायम ध्येय
बाळगायला हवं आपल्या आयुष्याचा एक फोकस पॉईंट असावा जिथपर्यंत आपल्याला चालण्यासाठी रोडही माहित असावा त्यामुळे हे कोट्स फक्त शालेय सुविचारच आहेत शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी ही खूप उपयोगी असतील आपण आपल्या वर्गातल्या अशाच शालेय मित्र-मैत्रिणींना तुम्ही हे पाठवू शकतात जेणेकरून तर मित्रांनो आपण शाळेत जाणं का गरजेचे आहे व शाळा काय आहे आपण या विषयावर चर्चा करणार आहोत तर शाळा म्हणजे काय शाळा ही एक असं मंदिर आहे जिथे
आपल्याला ज्ञान हा एक पुजारी असतो त्यामुळे हा जो पुजारी असतो हा आपल्याला फुकट मध्ये प्रसाद म्हणजेच आपल्याला ज्ञान पाजत असतो किंवा ज्ञान वाटत असतो आपण शाळेत गेल्याने आपलं ज्ञान अधिक वाढते व आपण भरपूर साऱ्या गोष्टी शिक्षणातूनच शकतो आपल्याला आपल्या आयुष्याला व आपल्या वर लावणारे संस्कार हे पुजारीच देत असतात म्हणजेच शिक्षकच देत असतात तर आपण आपल्या शिक्षकांचा कायम शेवटपर्यंत आदर करायला हवा आणि ते काय
बोलतात त्यांची आज्ञा पाळली पाहिजे त्यांचा सन्मान केला पाहिजे कारण एक ज्ञान वाटणारी व्यक्ती ही खूप श्रेष्ठ असते आपण असेही म्हणतो की आपला शिक्षक ही आपली दुसरी आई असते जी आपल्याला सगळं काही शिकवते आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आई-बाबांनी आपल्याला इतकं सांभाळलेलं नसतं जितका आपले शिक्षक सांभाळत असतात त्यामुळे त्यांचा आदर हा नक्कीच झाला पाहिजे व त्यांना आणि आदर केलं नाही पाहिजे त्यांचा सन्मानही वेळोवेळी करायला हवा तर बघुयात आपण अशाच नवीन शालेय सुविचार मराठी छोटे 50 कोट्स.
Marathi Suvichar For Students | शैक्षणिक सुविचार मराठी;
पुस्तकांमुळे मस्तक संपन्न होते आणि
या संपन्न मस्तकापुढे सारे जग नतमस्तक होते.🙏🙏
जो विद्यार्थी परिक्षेच्या वेळी कॉपी करतो
तो विद्यादेविच्या पवित्र मंदिरात निंद्य आचरण
करतो. तो पापीच होय.
आपल्या कामाच्या बाबतीत सूर्यासारखे तेज
असावे पण आपल्या आचरणामध्ये मात्र चंद्राची
शीतलता असली पाहिजे.
उथळ विचारांची माणसे देवावर विश्वास ठेवतात,
शहाणी आणि समर्थ माणसे कार्य-कारभारावर विश्वास ठेवतात.
इमर्सन
माझ्या देशातील प्रत्येक तरूणतरूणीने कोणते
पुस्तक वाचावे, कोणते वाचू नये हे ठरविण्याचे
अधिकार मला द्या. मी तुम्हाला देशाच्या प्रगतीची हमी देतो.
Good Night Marathi Suvichar | शुभरात्री सुविचार;
सचोटी श्रीमंतीचे तोंड पाहत नसते. ती परिश्रमाच्या पाळण्यात
हसत असते आणि समाधान हे वडिलांप्रमाणे तिला पाहून तृप्त होत असते.
युद्धात निर्धार,औदार्य व शांततेत सदिच्छा हवी.
सोने चांदी देऊन सुद्धा गेलेला क्षण खरेदी करू शकत
नाही म्हणून प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा.
हृदयाने हृदयाला ओळखणे हाच सर्वश्रेष्ठ धर्म होय.
कोणत्याही गोष्टी पूर्वी तयार होणे हे यशाचे रहस्य आहे.
Changle Vichar Marathi;
फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास
आणि स्वत:साठी जगून
दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
काम करणे हे जर अटळ आहे तर
ते काम हसत हसत का करू नये?
जो मूळ सोडून फाद्यांचा शोध घेतो तो भरकटतो,
दुर्बल मनाचा मनुष्य
कधीच महात्मा होऊ शकत नाही.
अन्न हे पूर्णब्रह्म आहे;
त्याचा अनादर करू नका.
आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल
असे कधीही वागू नका.
Marathi Suvichar;
स्तुतीने चांगली माणसे सुधारतात,
तर वाईट माणसे बिघडतात.
परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय,
कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
आपली बाग सजवताना दुसऱ्यांची
फुले विस्कटणार नाहीत याची काळजी घ्या.
मदत करण्यासाठी पुढे केलेला एक हात
हा प्राथेनेसाठी जोडलेल्या
दोन हातांपेक्षा आधिक उपयुक्त असतो.
चिंतेऐवढे शरीराचे शोषण
दुसरे कोणीही करू शकत नाही.
Sundar Vichar Marathi;
झाडावर प्रेम करणारा
माणूस सदैव प्रसन्नच असतो.
सुखापेक्षा दुःखामुळे होणारे ज्ञान
श्रेष्ठ दर्जाचे असते.
क्रांती हळूहळू घडते;
एका क्षणात नाही.
बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत
सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
अज्ञानाची फळे नश्वर असतात,
ती सकाळी जन्माला येतात,
आणि सायंकाळी नष्ट होतात.
अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ! अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते. ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो. विचार कुठुनही घ्यावेत पण घेताना ते पारखून घ्यावेत. शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय. दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं. संसारातल्या तारा मोठ्या नाजूक असतात. तालाची एक मात्रा चुकली तरी त्या नाराज होतात, सूर बेसूर होतात. म्हणूनच संसाराचं गाणं गाताना फार जपावं लागतं स्वत:लाही आणि इतरांनाही ! प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते, तर जपवणूक आयुष्यभरासाठी. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल. या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब. आनंद नेहमी चंदना सारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावा आपलीही बोटे सुगंधित करून जातो आपण अशा ठिकाणी पोहोचलो पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी केल पाहिजे सुख हे फुलपाखरा सारखे असते, पाठलाग केला तर उडुन जात, बळजबरी केली तर मरून जात, निरपक्ष:पणे काम करत राहील तर, अलगत येउन मनगटा वर येउन बसते तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल, तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो हसणे हि निसर्गाने आपल्याला दिलेली अनोखी देणगी आहे आणि आपण ती जेव्हा अन जिथे हवी तशी उधळू शकतो आनंद हे अमृत आहे परंतु हे अमृत प्राप्त करून घेण्यासाठी मंथन करणे आवश्यक आहे. दुःखाचे मंथन केल्याने आनंदरूपी अमृत प्राप्त होतो दु:ख हे कधीच दागिन्यांसारख मिरवू नका …!! वाटू शकलात तर आपला आनंद वाटा . . !! लोक तुमच्याकडून आनंदाची अपेक्षा करतात, कारण दु:ख त्यांच्याकडे पण भरपूर आहे …. !!! आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका मोठी माणसे व छोटी मुले यांना जोडणारा एक पूल म्हणजे खेळकरपणा होय आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा….. प्रेम् मधुर आहे, त्याची चव चाखा…. क्रोध घातक आहे, त्याला गाडुन टाका…. संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा…. आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना ह्रदयात साठवून ठेवा…. जीवन चहा बनवण्यासारखे आहे …. अहंकाराला उकळू द्या, चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या, दु:खांना विरघळून जाऊ द्या, चुकांना गळून घ्या आणि सुखाचा आनंद हसत हसत घ्या आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा- तुम्ही इतरांसाठी काय चांगला केल ते आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केल ते जर तुम्हाला खरच आनंद अनुभवायचा असेल तर आपल्या दु:खाशी खेळायला शिका हास्य हा एक उत्तम उपाय आहे… संकटाना समोर जाण्यासाठी, मनातील भीती दूर करण्यासाठी आणि झालेलं दु:ख लपवण्यासाठी जसा तुम्ही मुक्कामाचा आनंद घेणार आहात तसाच प्रवासाचा आनंद घ्यायला शिका एखाद्या व्यक्तीची खरी ओळख 😇 त्याच्या चेहऱ्यावरून किंवा कपड्यांवरून नव्हे तर त्याची वागणूक आणि त्याच्या गुणांवरून होत असते✔ चांगल्या गोष्टीतून चांगल्याची निर्मिती होते 😇 तसेच वाईट गोष्टीतून वाईटाची निर्मिती होते✔ पाण्याचा एक थेंब मातीत पडला तर तो नष्ट होतो जर तो हातावर पडला तर चमकतो 😇 जर शिंपल्यात पडला तर त्याचा सुंदर मोती होतो थेंब तोच असतो फरक फक्त त्याच्या सोबतीचा असतो✔ दुसऱ्या कोणीतरी काही करायला पाहिजे 😇 यापेक्षा मी स्वतः काहीतरी करायला पाहिजे हा दृष्टिकोन आपल्या आयुष्यातील खूप प्रश्न सोडवतो✔ आपल्या जीवनात कोणत्याच मर्यादा नाहीत सीमा नाहीत 😇 जीवनात तेवढ्याच मर्यादा सीमा आहेत ज्या आपण आपल्या मनात निर्माण करतो✔ कोणाच्याही परिस्थितीवर कधीही हसू नये ✌ प्रत्येक जण आपल्या आयुष्यात अनेक संकटांशी लढत असतो काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना नाही✔ विश्वास हा एखाद्या खोडरबर प्रमाणे असतो ✌ आपण केलेल्या प्रत्येक चूकी बरोबर तो घटत जातो✔ आपण जीवन किती जगलो ह्यापेक्षा ✌ आपण जीवन कसे जगलो हे खूप महत्त्वाचे आहे✔ आयुष्यातील सर्वच प्रश्न सुटत नाहीत ✌ परंतु काही प्रश्न विसरलो की ते लगेच सुटतात✔ आठवणींचा आनंद देतो तो आपला भूतकाळ ✌ स्वप्नांचा आनंद देतो तो आपला भविष्यकाळ परंतु जीवनाचा खरा आनंद देतो तो आपला वर्तमानकाळ✔ नेहमी तत्पर रहा, बेसावध आयुष्य जगू नका. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा. थोडे दुःख सहन करुन दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. प्रसिध्दी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो. आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं. माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते. स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते. सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते, ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात, एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता. छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असालं तर, तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि, तुम्ही किती असामान्य आहात. यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही, पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा. प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्की गाठतात. फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. हिंसा हे दुर्बलांचे शस्त्र आहे, अहिंसा हे सबलांचे. प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा मी कुणासाठीतरी आहे ही भावनाच किती श्रेष्ठ ! दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात. पापी माणसाला पाप कधीही शांतपणे झोपू देत नाही. उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो. जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य. शिक्षण हे एक असे शस्त्र आहे ज्याच्या मदतीने आपण हे सर्व जग बदलू शकतो. शिक्षणाने मनुष्य जीवनाचा उद्धार होतो. शिक्षणाची मुळे ही कडू असतात पण त्याला लागलेली फळे मात्र गोड असतात. शिक्षण हे भविष्याचा पासपोर्ट आहे. अपयश हेच यश असते जर आपण त्या अपयशाकडून काही धडा शिकलो असेल तर. शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे, जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता. शिक्षक जीवनाचे दार उघडत असतो, तर विद्यार्थ्यालाच त्यातुन प्रवेश करायचा असतो. शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण. माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मान-अपमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात. प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका… स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. जे लोक माझी परीक्षा घेण्याचे प्रयत्न करतात 😎 त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य माझ्याजवळ आहे✔ जर तुम्हाला कोणी Reject केले तरी जराही वाईट वाटून घेऊ नका 😎 कारण सामान्य लोकांना महागड्या वस्तू परवडत नाहीत त्यांची तेवढी ऐपत नसते✔ यशस्वी होण्यासाठी इतके प्रयत्न करा की 😎 तुम्हाला हरवण्यासाठी कट रचले गेले पाहिजेत✔ कितीही अभ्यास करूनही 😎 न समजणारा Subject म्हणजे आपण✔ इतिहास साक्षीदार आहे 😎 खवळलेल्या महासागराचा कधी शांत दिसणाऱ्या व्यक्तीचा ☺ कधीही नाद करू नये दोघेही तुम्हाला बुडवून टाकण्याचे सामर्थ्य ठेवतात✔ माझा अनुभव हाच सांगतो कि नेहमी शांतता चांगली 😏 कारण नाजूक शब्दांनी लोक नाराज होतात ✔ जे लोक तुम्हाला पाठी मागे बोलतात 😏 त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका ते तुमच्या पाठी होते आणि नेहमी पाठीच राहणार 😇 आणि तुम्हाला फेमस करणार त्यांची लायकी तिचं आहे✔ रुद्राक्ष असो वा माणूस असो 😏 खुप अवघड असत एकमुखी भेटणं✔ बोलून विचार करण्यापेक्षा 😏 बोलण्याआधी विचार केलेला केव्हाही चांगला ✔ आपले नातेवाईक सुद्धा तेव्हाच नातं निभावतात 😏 जेव्हा आपल्याकडे पैसाअडका असेल ✔ आपल्या निर्णयावर नेहमी 😊 ठाम राहायला शिकावे मग तो निर्णय चुकला तरीही😇 काही हरकत नाही स्वतःवर मनगटावर विश्वास असला की आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते✔ शुन्यालाही खूप किंमत असते 😊 तुम्ही फक्त त्याच्यापुढे उभे राहून तर बघा✔ जेव्हा खूप प्रयत्न करून सुद्धा 😊 काहीच हाती पडत नाही तेव्हा मिळतो तो खरा अनुभव✔ एकमेकांविषयी दुसऱ्यापाशी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला 😊 तुमच्या मधील खूप सारे गैरसमज दूर होतील आणि प्रेम जिव्हाळा नक्कीच वाढेल✔ आपल्या पायाला स्पर्श करून जाणाऱ्या लाटा त्याच असतात 😊 ज्या मोठमोठी जहाजे बुडवण्याचे सामर्थ्य ठेवतात✔ माशांसाठी हवा आणि पाणी जितके आवश्यक आहे तितकेच मानवी जगण्यासाठी आत्मविश्वास आवश्यक आहे. आत्मविश्वास असल्याशिवाय माणसाला यश मिळू शकत नाही. आत्मविश्वास ही अशी उर्जा आहे जी एखाद्या व्यक्तीला आव्हाने, अडचणी आणि यशासह येणार्या अडथळ्यांना तोंड देण्यास धैर्य देते. तुमचा आत्मविश्वास वाढो या साठी हे विशेष पॉझिटिव्ह आत्मविश्वास सुविचार मराठी. उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात व ते सर्व खूप काही शिकवून जातात. ‘मदतीचा हात कुठे मिळेल?’ याच्या शोधात तुम्ही आहात काय? तर माझे ऐका, तो हात तुमच्या मनगटाजवळ आहे. देव प्रत्येक पक्षाच्या चोचीसाठी घास निर्माण करतो पण तो घास त्याच्या घरट्यात आणून देत नाही पक्षाला तो घास शोधून आणावा लागतो. घोड्यावरून पडलात तर पुन्हा सावरले जाल, मनातून उतरलात तर सावरू शकणार नाही. माणसाच्या उच्चारावरून त्याची विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आचराणावरून शील समजते. पं. जवाहरलाल नेहरू विसरणे हा मानवाचा धर्म आहे, पण लक्षात ठेवणे हे त्याचे कर्तव्य आहे. शत्रु आणि मित्र, मान आणि अपमान, सुख आणि दु:ख यांची ज्याला जाणीव होते, तोच जीवनात यशस्वी होतो. वि.स.खांडेकर स्वत:बद्दलचा खोटा अहंकार सोडून देण्याची किंमत ज्याला कळली तोच खरा सुखी माणूस होय. साने गुरूजी ज्याची बुद्धी आणि शरीर ही उद्योगात गढलेली असतात त्याला चिंता स्पर्श करीत नाही. जॉन्सन काळ, वेळ पाहून जो मृदुपणाने वागतो आणि योग्य वेळी कठोरही होतो त्याची सर्व कामे नीट पार पडतात व तो शत्रूलाही ताब्यात ठेवतो. गर्व’ म्हणजे क्षुद्र मनोवृत्तीचे लक्षण गर्विष्ठ माणसाने कितीही भपकेदार पोशाख केला तरी वागण्यातून त्याच्या मनाचे दारिद्र्य दिसून येते. वर्डस्वर्थ ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना, त्या दिवसापासून थकायचा आणि रूसायचा अधिकार संपतो. सकाळचे जाग आल्यावरचे क्षण नेहमी शुद्ध असतात.निर्लेप असतात,दिवसाच्या कटकारस्थानांचा, कपाटांचा, खोटेपणाचा थर त्यावर चढलेला नसतो. प्रार्थना व ध्यान आपल्याला खूपच आवश्यक असणारी गोष्ट आहे. प्रार्थनेने देव तुमचे ऐकतो आणि ध्यानामुळे तुम्ही देवाचे ऐकता. अहंकार हा तप साधनेचा महान शत्रू आहे. गुरूदेव रानडे विनम्रवृत्ती हे सर्व दैवी गुणाचे मुळ आहे. गौतम बुद्ध निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनतात तर पॉझिटिव्ह विचार माणसाला नेहमी बलवान बनवतात. लोक तुमच्याविषयी काही चांगलं ऐकलं तर संशय व्यक्त करतात, अविश्वास दाखवितात, पण तुमच्याविषयी वाईट काही ऐकले तर मात्र लगेच विश्वास ठेवतात. माणसाचे भवितव्य त्याच्या तळाहातावरील रेषांवर अवलंबून नसून त्याच्या मनगटातील शक्तीवर अवलंबून असते. स्वातंत्र्यवीर सावरकर सगळ्यात मोठा सूड म्हणजे प्रचंड यश. दुसऱ्याला काहीतरी उपयुक्त गोष्ट दिल्याने आपला आनंद वाढतो आणि दुसऱ्याला मदत करण्यासाठी कष्ट घेतले असता आपले दुःख कमी होते. ज्यांना स्वत:च काही करावयाची इच्छा नाही त्यांना मदत करण्यात अर्थ नाही. ज्याला वर जायची इच्छाच नाही त्याला तुम्ही शिडीवर चढवू शकणार नाही. जीवनाच्या बँकेमध्ये पुण्याईचा बँक बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही. पराक्रमाचा अभिमान असावा, पण उन्माद नसावा. वि. स. खांडेकर दसऱ्यांवर अन्याय करू नका. आपल्यांवर अन्याय झाला तर प्रतिकार करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकार पुढच्या दाराने आत शिरला की शहाणपण मागच्या दाराने निघून जाते. टॉमस फुलर यशस्वी व आनंदी जीवनासाठी जीवनात यश संपादन करण्यासाठी प्रेरणादायी सुविचार नक्की वाचा. तर मित्रांनो आमच्याशी आशा आहे की आपल्यास वरील पोस्ट आवडली असेल आम्ही काही शालेय सुविचार मराठी छोटे 50 या विषयावर वर कोट्स लिहिलेले आहेत आम्हास अशी नक्कीच आशा असेल की आपल्या सी कोर्स आवडले असतील व आवडल्यास तुम्ही ते आम्हास कमेंट करून सांगा जेणेकरून आम्हास अजून टवटवीत व मजेदार विषयांवर पोस्ट बनवण्यासाठी प्रेरणा मिळवा आम्ही तुमच्या समोर ते सादर करू. तर मी शाळा का महत्त्वाची आहे व भरपूर साऱ्या सुविचारांवरही स्पष्टीकरण दिलेला आहे आपल्या आयुष्यात शाळा ही खूप महत्त्वाची आहे आपल्या आयुष्यात शिक्षकांची शिक्षकाचे व शिक्षणाचे महत्त्व मी तुम्हाला सांगितलेले आहे शिक्षण आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे आपण शिक्षित असायला हवं कारण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन कोणी आपला गैरफायदा नाही घेतला पाहिजे म्हणून आपण शिक्षित असायलाच हवं . पुढे जाऊन आपल्या आयुष्यामध्ये आपला कोणी गैरफायदा न घ्यावा म्हणून तरी आपण शिक्षित राहायलाच हवं शाळा ही एक मंदिरासारखा आहे जशी की मी तुम्हाला सांगितलेस शाळा आपल्याला खूप काही शिकवते शिक्षक हे आपले दुसरे आई-वडील असतात जे आपल्याला आई-वडिलांपेक्षाही जीव लावतात व आपली काळजीही घेतात आणि वेळ आली की आपल्याला रागवतात आहे आपल्यावर चांगली संस्कार लागावी तुम्ही शिक्षक आपल्याला खूप मदत करत असतात आपल्या संस्कारांवर खरंतर शिक्षकांचा हक्क आहे कारण आईबाप लावतातच संस्कार पण शिक्षकांचे संस्कार खूप खूप महत्त्वाचे असतात त्यामुळे आपण त्यांचा कायम सन्मान केला पाहिजे व त्यांना इज्जतही दिली पाहिजे . जसा आपल्या आयुष्यात शिक्षण महत्त्वाचे असते आपल्या आपल्याला खूप गरजेचे आहे त्यामुळे आपण त्यांचा आदर नक्कीच केला पाहिजे व माझं सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण जितकं शिकत जाऊ आपल्याला तितकं ज्ञान प्राप्त होते म्हणजे ज्ञान ही एक अशी गोष्ट आहे तुझी आपण किती जरी शिकली तरी ते पूर्ण झालेलं नसतं खोलात जाऊ तितका आपल्याला बारकाईने विचार करता येईल व आपलं ज्ञान अजून वाढत जाईल. तर मित्रांनो आपल्यासवडलेला एक अतिशय सुंदर सुविचार तुम्ही आम्हास कळवू शकता तर आपण नक्कीच आम्हास सांगा की तुम्हाला शालेय सुविचार मराठी छोटे 50 ही पोस्ट कशी वाटली धन्यवाद.100 Suvichar in Marathi;
Marathi Suvichar Sangrah;
Quotes in Marathi;
आनंदी मराठी सुविचार | Quotes On Happiness In Marathi Suvichar;
Quotes On Happiness In Marathi Suvichar;
Happy Good Thoughts In Marathi;
Good Thoughts In Marathi | चांगले विचार स्टेटस मराठी;
Marathi Status On Life | मराठी स्टेटस जीवन | मराठी स्टेटस आयुष्य;
Marathi Suvichar;
100 suvichar in marathi;
sundar vichar marathi;
Marathi Suvichar;
Suvichar in Marathi;
Marathi Suvichar;
Marathi Suvichar for Students;
शालेय सुविचार मराठी छोटे Education Quotes in Marathi;
शिक्षण मराठी सुविचार । Education Quotes in Marathi | Education Marathi Suvichar;
Attitude Quotes In Marathi | रॉयल मराठी स्टेटस;
Taunting Quotes On Relationships In Marathi | टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक;
Positive Thoughts In Marathi | मराठी प्रेरणादायी सुविचार;
Suvichar in Marathi | आत्मविश्वास सुविचार मराठी;
सुंदर सुविचार मराठी |Suvichar in marathi text;
Life Suvichar Marathi | नविन मराठी सुविचार;
Marathi Suvichar Good Morning | शुभ सकाळ सुविचार;
Success Marathi Suvichar | मराठी स्टेटस प्रेरणादायी;
Inspirational Marathi Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार;